ही गोष्ट त्या भोळ्या भाबड्या आईवडिलांना किती पचनी पडली असती , बिचारे मंदिरात दिवसरात्र पुजा अर्चना करणारे , त्यांची अशी का परीक्षा बघावी. यातून ते बाहेर पडले, बालीच्या डोळ्यावरची पट्टी उतरली, तिला घरी आणुन लगेच मावशीकडे नेवून ठेवली, छानसा मुलगा भेटला तिच लग्न करून दिले. ती सुखाने तिच्या सासरी नांदत आहे. तिला दोन मुले आहेत प्रेम करणारे लोक आहेत. सुखी संसार करते आहे. जर का ती आली नसती इकडे तर तिची काय दैना झाली असती. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आजच्या तरून मुलामुलिंनी जपून वागायला पाहिजे. नाहीतर अख्खी जिंदगी नरकवास भोगावे लागतात. जन्म देणारे आईवडिल तुमचे दुष्मन नसतात, त्याना धोक्यात ठेवने म्हणजे पुर्ण जगाला व देवाला सुद्धा धोका देणे आहे.
Loading comments…