आपण नाही बाबा ताटाखालचं मांजर. मी कमावतो . ती सगळं माझ्या हातात आणून देते. नोकरीवाली बायको म्हणजे सगळा तिच काम करा. तिच्या बोटावर नाचावे लागेल." त्यामुळे त्याला शारदाने नोकरी केलेली नको होतं. भांडण शेवटी खूप विकोपाला गेलं. शारदा म्हणाली, " वेगळे होते." तेव्हा सुरज च्या डोक्यात प्रकाश पडला. आपलं कुठेतरी चुकतंय. हा संसार मोडायचा नाही. त्याने परवानगी दिली. खूप प्रयत्न केल्यावर एका ठिकाणी शारदाला नोकरी मिळाली. तिला खूप आनंद झाला होता. सुरज ही कसाबसा तिच्या आनंदात सामील झाला होता. दोघेही कमावू लागले. काही दिवसातच कर्ज काढून घर घेतलं. स्वतःचं हक्काचं घर. शारदाला तर विश्वासच बसत नव्हता. तिने स्वतःला चिमटे काढले. आपण खरंच आपल्या हक्काच्या घरात आलो. आपलं स्वतःचं घर झाला. दोघे एकत्र आले त्यामुळे शक्य झाले होते. दोघामुळे घर पूर्ण झालं होतं. शांतीच प्रेमाचं विश्वासाचे घर!!!
Loading comments…