सुरेशला रेल्वेत नोकरी लागली असल्याची बातमी त्यांच्या तोंडून ऐकतांना गुरुजीला खूप आनंद झाला तर सुरेश मनातल्या मनात म्हणू लागला माझ्या जीवनात तात्या गुरुजी आले नसते तर कदाचित आज मी जे काही आहे, ते राहिलो नसतो. असे म्हणत त्याने तात्या गुरुजींचे आशीर्वाद घेतले. एका शाळाबाह्य मुलांचे जीवन सुधारू शकलो याचे गुरुजींना मनोमन समाधान वाटत होते. रेल्वेमध्ये फावल्या वेळात सुरेशला दिलेले शिक्षणाचे धडे खूप मोठे कार्य करून गेले.
Loading comments…