असंच.... तुम्हाला काही द्यायचं आहे... हि मेणबत्ती पकडा जरा... " अभिषेकने एका हाताने मेणबत्ती पकडली आणि दुसऱ्या हाताने तो आपली पिस्तुल शोधू लागला. पण पिस्तुल तर बाईक वरच राहिली होती. नोकर वळला. तसा अभिषेकने त्याच्या हातात सुरी बघितली... " काय करतो आहेस हे? " अभिषेक घाबरतच म्हणाला ," नाही.... तुम्ही बोलला होतात ना... बाकीचे कुठे आहेत ते... त्यांच्याकडे घेऊन जातो तुम्हाला... " त्याच्या नोकराने सुरी त्याच्यासमोर रोखून धरली.... जणू काही तो कोणत्याही क्षणाला त्याच्या छातीत भोसकणार.. तेवढयात....तेवढयात....आकाशात पुन्हा वीज जोरात कडाडून गेली.... आणि अभिषेकच्या हातातली मेणबत्ती विझली. पुन्हा भयाण शांतता ... आणि अचानक... घरातले सगळे दिवे लागले... " surprise " घरातली सगळी मंडळी एकत्र बोलली आणि गाऊ लागली ....
Loading comments…