खोडकर फुलपाखरांच एक छोट जग, त्यात असतात सुंदर अशी आठवणीची फुल. त्यातील गोड मध चाखत चाखत हे जीवन पुढे जात असते,ते कधीच संपू नये असे वाटते. असंच एक ठिकाण असत, जिथे आमच्या सारखी मुल बाईच्या शांत अश्या सावलीत मोठी होतात.... हे एक मित्रांच्या , त्या दिवसांच्या कडू - गोड आठवणीनी वसलेलं एक छोटंसं गाव असतं आणि त्या गावाला " शाळा " हे नाव असतं." विवेकने आपलं बोलणं संपवलं तसा वर्गात टाळ्यांचा कडकडाट झाला. सगळी मुल-मुली मनापासून टाळ्या वाजवत होते. बाईंच्या डोळ्यात तर पाणी आलं. बाईंनी डोळे पुसत सगळ्यांना " शांत राहा " अस सांगितले. " खरंच .... खूप सुंदर वर्णन केलस तू.... अगदी मनातलं बोललास तू... आणखी एक .... एव्हढ्या छान निबंधाला एक छान नावही असलं पाहिजे... तूच सांग एखादं " ,विवेकने त्याच्या मित्रांकडे बघितलं. सगळ्यांचे चेहरे आनंदाने फुलले होते..... सईकडे पाहिलं .... तीही खूप छान हसत होती ... त्याने पुढे येऊन बाईंच्या हातातला खडू घेतला आणि त्याने फळ्यावर लिहिलं ,......... " कधीही न विसरता येणारे ..... " सोनेरी दिवस "
Loading comments…