तर काळकुपी म्हणजे ? त्याआधी ही गाठोडी सोडुयात म्हणजे संदर्भासहीत स्पष्टीकरण मिळेल....गाठोड्यांवरून आठवलं...माझा हुद्दा सांगितला पण इतका वेळ माझी फक्त बडबड ऐकणारयांना माझं नाव काय हे ऐकण्याची उत्सुकता असेलच की, मी अनुज चित्रे आडनावातला चित्रकार आणि शब्दांचा शिल्पकार...वाह इथे पण कलाकारी!! तर 3 वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात माझ्या स्मरणिका आणि बायको दोघांच्याही कपाळाची पाटी कोरी झाली....मग मी दरवर्षी तिला ह्या काळकुपित भेटायला यायला लागलो... झालं असं की, माझ्याच नाटकातल्या पात्राचा मी माझ्या लेखणीने खून केला म्हणून शब्दांच्या कोर्टाने मला ही सूनावलेली शिक्षा...
Loading comments…