कितीतरी वेळ तो शांतपणे बसून राहिला. नंतर निर्धारपूर्वक तिच्या अगदी जवळ जाऊन तो म्हणाला, "माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे..आणि बघू ते किती खरं आहे. माझ्या प्रेमानं तुझं हे निर्जीव झालेलं शरीर बदलेल हळूहळू. ते स्पर्शानं मोहरेल. तू काही काळजी करू नकोस, माझ्या प्रेमाने तुझ्यात 'भावना' परत जागृत होतील. .काही काळ जाऊ दे, अगदीच काही नाही झालं तर मग ठरवू नंतर आपण." त्याच्या या पुन्हा एकदा निर्णयात्मक बोलण्यानं ती एकटक त्याच्या डोळ्यात पाहू लागली. त्यानं तिचा हात हातात घेतला. त्याच्या आश्वासक स्पर्शाने तिच्या डोळ्यात अश्रू आले होते.
Loading comments…