माझे भरलेले डोळे लपवणे मला अवघड झाले तसे मी उठुन बाहेर पडलो आणि जिथे आम्ही शेवटचं भेटलो त्या वडाच्या झाडाजवळ आलो. सुर्य मावळतीकडे झुकला होता. वडाच झाड उदास वाटायला लागलं. संध्याकाळची उदासिनता झाडाबरोबर माझ्या मनात शिरत गेली. दुरवर गाणा-या फकीराची विराणीचे स्वर माझ्या काळजाला भिडत गेले रीताच अस्तित्व माझ्या सभोवताली आसल्याच मला जाणवल.ती अजुनही त्याच वळणावर थांबली जिथे तिला मी सोडल अस मला प्रकर्षाने जाणवले..आता कुठे असेल ती?
Loading comments…