राज जड पावलाने घरी आला. आई वडील व विराज चिंताग्रस्त होऊन वाट पहात असताना पाहून त्याला आश्चर्य वाटले. मग सगळी गोष्ट त्याच्या लक्षात आली. आईवडिलांनी त्याला धीर दिला. विराजनेही मदतीचा हात पुढे केला. चौघांनी मिळून पैसे कसे मिळवता येतील. त्याचा आराखडा केला. पैसे उभे करून दिले. त्याने पैसे नेऊन कंपनीत भरले. लवकरात लवकर गेलेले पैसेही कंपनीला मिळवून दिले. पुन्हा अशी चूक घडणार नाही म्हणून माफी हि मागितली. नोकरी वाचली. पैसेही मिळाले. राज मोठ्या संकटातून सहीसलामत सुटला. शंभर मित्रांपेक्षा संकटात धावणारा एकच मित्र बरा. हे त्याला पटले. आई वडिलांपेक्षा चांगला मित्र हितचिंतक असूच शकत नाही. हेही त्याला उमजले.
Loading comments…